आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठणाबाबत लवकरच तोडगा : जेटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई- महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या हप्त्याची फेररचना करण्याबाबत लवकरच सकारात्मक ताेडगा काढू, असे अाश्वासन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी दिले अाहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने बुधवारी दिल्लीत जेटलींची भेट घेऊन कारखानदारांच्या मागण्या मांडल्या. या वेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह राज्यातील साखर संघाचे पदाधिकारी उपस्थित हाेते. ‘साखर कारखान्यांना साठा ठेवण्याबाबत घातलेले निर्बंध उठवणे, इथेनाॅल हे विषय इतर मंत्रालयाशी संबंधित अाहेत. संबंधित मंत्र्यांसाेबत बैठक घेऊन लवकरच याबाबत ताेढगा काढला जाईल. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील,’ असे अाश्वासन जेटली यांनी शिष्टमंडळाला दिले.

अाज मुख्यमंत्र्यांना भेटणार
दरम्यान,कोंडीत सापडलेली सहकारी साखर कारखानदारी आणि सहकारी िजल्हा बँका यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी शरद पवार गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार अाहेत. एक हजार मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, राज्यातील ऊस लागवड क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात यावा, दुष्काळी भागातील १० िजल्हा बँकांना अल्पमुदतीची कर्जे द्यावीत, गळीत हंगामासाठी अल्प मुदत कर्जे मिळण्यासाठी थकहमी द्यावी, उसावर खरेदी कर माफ करण्यात यावा आदी मागण्या पवार करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...