आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचे दर कोसळू देणार नाही- रावसाहेब दानवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशात साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्याने साखरेचे दर कोसळणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे शेतक-यांत चिंतेचे वातावरण आहे. मात्र, साखरेचे भाव कोसळू देणार नाही, असे आश्वासन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले.

दानवे, खासदार संजयकाका पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी कृषी भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी राज्यात कोलमडू पाहणारा साखर उद्योग स्थिर ठेवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांना संयुक्त स्वाक्षरीने या संदर्भात पत्र पाठवले असून त्यांच्यापुढे साखर उद्योगाची वस्तुस्थिती मांडणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. जे लोक साखरेचे भाव कोसळत असल्याच्या अफवा पसरवतील, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.