आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींचा राहुल गांधींवर पलटवार, \'सुटकेसपेक्षा सुट-बुटचे सरकार चांगले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर 'सुट-बुट की सरकार' अशी टिका करतात. काँग्रेस नेत्यांच्या या टिकेला पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, 'सुटकेसच्या सरकारपेक्षा सुटा-बुटातील सरकार निश्चितच चांगले आहे.' शनिवारी मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर पलटवार केला आहे. ते म्हणाले, 'गरीबांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे दाखवणाऱ्या काँग्रेसमुळेच आज गरीबांची ही दशा झाली आहे.'
जानेवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा ओबामांच्या भेटी दरम्यान नरेंद्र मोदींनी स्वतःचे नाव छापलेला सुट परिधान केला होता. तेव्हापासून राहुल गांधी संसदेपासून रस्त्यापर्यंत मोदी सरकारला सुट-बुट की सरकार म्हणून निशाणा साधत असतात.
जनता देईल मला गुण
पंतप्रधानांना जेव्हा विचारण्यात आली, की वर्षभराच्या कामगिरीचे मुल्यांकन तुम्ही कसे करता. सरकारला तुम्ही दहा पैकी किती गुण देणार. मोदीं म्हणाले, 'देशातील जनता माझ्या कामाचे मुल्यमापन करेल. हा त्यांचा अधिकार आहे. तो मी त्यांच्यापासून हिसकावून घेऊ शकत नाही. मी माझे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर ठेवले आहे.'
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आल्यानंतर, एका वर्षात तुम्ही आश्वासने पूर्ण केली का ? या प्रश्नाच्या उत्तरात मोदी म्हणाले, 'माझ्या एक वर्षाच्या कामकाजावर मी खूष आहे. मी यासाठी खूष आहे कारण आम्ही आमच्या आश्वासनाप्रमाणे कामाचा प्रारंभ केला आहे. एकवर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा उल्लेख करताच तुम्हाला लक्षात येईल, की तेव्हा भ्रष्टाचाराचा किती बोलबाला होता. आमच्या सरकरावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप लागलेला नाही. वाईट दिवस आता संपले आहेत, हे देशासाठी चांगले दिवस नाहीत का ?' सरकार आणि उद्योगपतींचे साटेलोटे असल्याचा आरोप होतो, त्यावर ते म्हणाले, 'ज्यांनी कोळसा, स्पेक्ट्रम सारखे देशाचे रिसोर्सेस कवडीमोल भावाने उद्योगपतींना विकले, त्यांना असा आरोप करण्याचा काही अधिकार नाही.'