आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suitcase Gun Spotted During Prime Minister Narendra Modi's Nepal Trip

मोदींच्या सुरक्षेसाठी होतोय 'ब्रीफकेस गन'चा वापर; नेपाळ दौर्‍यात दिसले हे गुप्तशस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेसाठी 'ब्रीफकेस गन'चा वापर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदींनी नुकताच नेपाळ दौरा केला. दौर्‍यादरम्यान मोदींच्या सुरक्षेसाठी ब्रीफकेस गन सज्ज ठेवल्याचे उघड झाले आहे.

मोदींनी नुकताच दोन दिवसीय नेपाळ दौरा केला. त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. याबाबत कमालीची गोपनियता पाळण्यात आली होती. मोदींच्या सुरक्षेत हायटेक टेक्नॉलॉजी वापरली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एका सूटकेसमध्ये छुपी मशीनगनही (HK MP5K) होती. याचे छायाचित्र 'रॉयटर्स'च्या एका फोटोग्राफरने जारी केले आहे. कदाचित पहिल्यादा देशाच्या पंतप्रधानांना अशा प्रकारच्या गुप्त शस्त्रद्वारा सुरक्षा देण्यात आली आहे.

'रॉयटर्स'चे फोटोग्राफर नवेश चित्राकर यांनी ब्रीफकेसचे छायाचित्र जारी केले आहे. 'तीन ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काठमांडूत नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांची भेट घेतली. दरम्यान एक काळ्या रंगाची सूटकेस आढळली. त्यात छुपी मशीनगन होती.' असे कॅप्शन या छायाचित्राखाली लिहिले आहे. ब्रीफकेस गन ही भारतीय सुरक्षा यंत्रणेची होती की, नेपाळी सुरक्षा यंत्रणेची याबाबत मात्र समजू शकले नाही. मात्र, सूटकेसजवळ एक नेपाळी सुरक्षारक्षक उभा होता.

HK MP5K ब्रीफकेस गन?
HK MP5K ब्रीफकेस गन एक गुप्त शस्त्राच्या रुपात वापरले जाते. ब्रीफकेसला एक छिद्र असते. त्याला ब्रीफकेसमध्ये लपवून ठेवलेल्या मशीनगनची नळी असते. हॅंडलमध्ये मशीनगनचे ट्रिगर बसवलेले असते. यात जर्मनीद्वारा डिझाइन करण्‍यात आलेली MP5 सब मशीनगनचे व्हर्जन MP5K चा वापर केलेला असतो.

MP5K चे वजन जवळपास अडीच किल असते. याची लांबी 12.8 इंच असते. नळी 4.5 इंचाची असते. या मशीनगनमधून एक ते दोन सेकंदात 15 ते 30 राउंड फायर केला जातात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, ब्रीफकेस गनची छायाचित्रे आणि व्हिड‍िओ...
(फोटो: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणार ब्रीफकेस गन)