आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sujatha Singh Ignored Strong Hints To Quit As Foreign Secretary

परराष्‍ट सचिव सुजाता सिंह यांची हकालपट्टी; त्‍यांच्‍या जागी "जयशंकर' यांची वर्णी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यानंतर केवळ भारतीय परराष्ट्र धोरणाचे संदर्भ बदलले असे नाही, तर भारतीय परराष्ट्र सचिवही बदलला आहे. ओबामा दौऱ्यादरम्यान सचिव पदावर असलेल्या सुजाता सिंह यांनी बुधवारी रात्री तडकाफडकी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी भारताचे अमेरिकेतील राजदूत व १९७७च्या बॅचचे आयएफएस अधिकारी सुब्रह्मण्यम जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जयशंकर (६०) यांच्या निवृत्तीला केवळ एक दिवस शिल्लक होता. मात्र, आता परराष्ट्र सचिवपदी विराजमान झाल्यानंतर ते दोन वर्षे या पदावर राहतील. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात जयशंकर यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. सुजाता यांचा परराष्ट्र सचिवपदाचा दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या ऑगस्टमध्ये संपणार होता. मात्र, तत्पूर्वीच त्यांना राजीनामा द्यावा लागला.

मीच निवृत्ती मागितली होती :
सुजाता यांना परराष्ट्र सचिवपदावरून काढून टाकल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असले तरी आपणच केंद्र सरकारकडे मुदतपूर्व निवृत्तीची मागणी केली होती, असा दावा सुजाता यांनी केला. परराष्ट्र सेवेशी संबंधित विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी २८ जानेवारी रोजी एक ई-मेल पाठवला होता. यात त्यांनी म्हटले होते की, "३८ वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर मुदतपूर्व निवृत्तीसाठी मी सरकारकडे अर्ज केला होता. कोणतीही संस्था उभी करणे आणि तिचे कार्यचलन सुनियोजितरीत्या चालावे म्हणून एखाद्या व्यक्तीचे योगदान तेवढेच महत्त्वाचे असते. मात्र, ही व्यक्ती एखाद्या संस्थेपेक्षा मोठी असू शकत नाही, असे माझे मत आहे...'
सुजाता यांना कदाचित आपल्याला हे पद सोडावे लागणार असल्याची कल्पना जानेवारीमध्येच आली होती. मात्र, काही धोरणात्मक बाबींमुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय काही दिवस लांबवला होता.

जयशंकरच का?
* मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात जयशंकर यांनी व्यवस्था यशस्वीपणे सांभाळली. शिवाय देवयानी प्रकरण मिटवून ओबामांचा भारत दौरा निश्चित केला.
* आण्विक कराराचे पहिले प्रारूप जयशंकर यांनी तयार केले. म्हणूनच अमेरिकेशी आण्विक करार होऊ शकला. चीनमध्ये राजदूत असताना त्यांनी चीनच्या मनातील भारताबद्दलचे गैरसमज दूर केले.
* रशियाशी असलेल्या संबंधांबाबत ते तज्ज्ञ आहेत. रशियात त्यांचे विविध क्षेत्रातील लोकांशी मैत्रीचे संबंध आहेत. याचा लाभ आगामी काळात भारताला होऊ शकतो.
* जयशंकर यांची आंतरराष्ट्रीय संबंधांवर पीएच. डी. आहे. राज्यशास्त्रात एम. ए. असलेले शंकर लंडन येथील इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडिजचे सदस्यही आहेत.
* जयशंकर यांचे वडील के. सुब्रह्मण्यम भारतीय धोरणांचे ज्येष्ठ अभ्यासक म्हणून ओळखले जातात.

बदलाचे कारण सांगा : काँग्रेस
सुजाता याना पदावरून का काढले याचे कारण मोदी सरकारने द्यावे. ओबामा दौऱ्यानंतर तत्काळ झालेल्या या कारवाईमुळे शंका निर्माण होत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

काँग्रेसला अधिकार नाही : भाजप
या निर्णयाचा राजकारणाशी काही संबंध नाही. वास्तविक अशा मुद्द्यांवर काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच नाही. यावरून इतका गोंधळ घालण्याची गरज नाही, असे भाजपच्या प्रवक्त्या नलीन कोहली यांनी म्हटले आहे.

डॉ. सिंग यांचीही तीच होती इच्छा
जयशंकर परराष्ट्र सचिव असावेत, अशी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचीही इच्छा होती. मात्र, सोनिया गांधी यांनी आपले वजन सुजाता सिंह यांच्या पारड्यात टाकले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण आहेत सुजाता?