आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सीमेजवळ सुखोई विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे सुखोई-३० हे युद्धविमान आसामच्या तेजपूर जिल्ह्यात बेपत्ता झाले आहे. विमानातील दोन्ही वैमानिकही बेपत्ता आहेत. हा भाग चीनच्या सीमेनजीक आहे. हवाई दलानुसार विमानाने मंगळवारी नियमित प्रशिक्षण उड्डाण घेतले होते. हवाईपट्टीपासून ६० किमीवर असताना विमानाचा रडारशी संपर्क तुटला.
 
विमानाचा शोध घेण्यासाठी लष्कर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहे. सुखोई-३० हवाईदलाच्या प्रमुख युद्ध विमानांपैकी आहे. ते १९९७ मध्ये भारतीय हवाईदलात समाविष्ट झाले होते. २०१४ मध्ये राज्यसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार सुखोई स्क्वाॅड्रनला युद्धासाठी सज्ज ठेवण्यासाठी २०११-१२ मध्ये ५५१ कोटी, २०१२-१३ मध्ये ८३४ कोटी रुपये खर्च झाले होते.
बातम्या आणखी आहेत...