आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sumerme Court Says Ramayana And Quran Are Not Trademarks

उत्पादने वा सेवा विकण्यासाठी \'रामायण-कुराण\' ट्रेडमार्क नाहीत- सुप्रीम कोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील कुणीही रामायण, कुराण, बायबल गुरूग्रंथसाहिब आदी पवित्र धर्मग्रंथ आणि शास्त्रांच्या नावाचा वापर आपली उत्पादने अथवा सेवा विकण्यासाठी ट्रेडमार्क म्हणून करता येणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

अगरबत्ती- अत्तर व्यावसायिक लालबाबू प्रियदर्शींना रामायणाचा ट्रेडमार्क म्हणून वापर करायचा होता. मात्र, बौद्धिक संपदा अपिलीय बोर्डाने परवानगी नाकारली. या आदेशाला प्रियदर्शींनी दिलेले आव्हान सुप्रीम कोर्टानेही फेटाळले.

कोर्ट म्हणाले, ‘रामायण’ हे महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे शीर्षक सुचवते. तो हिंदूंचा महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. यामुळे ते ट्रेडमार्कच्या रूपात रजिस्टर्ड करण्याची मंजुरी देता येत नसल्याचे, न्यायमूर्ती रंजन गोगोई व न्यायमूर्ती आर.के. अग्रवाल यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. अगरबत्तीच्या खोक्यावर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या फोटोच्या वापरावरही कोर्टाने आक्षेप घेतला.