आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunand Pushkar Tharoor...Twitt In Love Story By Twist

सुनंदा पुष्‍कर-थरूर: ...हसते हुए जायेंगे!,ट्विटमुळे प्रेम कहाणीत ट्विस्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुलफाम चेह-याचे शशी थरूर आणि सौंदर्यवती सुनंदा पुष्कर म्हणजे हायप्रोफाइल सेलिब्रिटी. सोशल मीडियावरील बहुचर्चित मंत्री. थरूर यांचे ट्विटरवर 2 कोटी फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह असणा-या थरूर यांना ‘ट्विटर मिनिस्टर’ही म्हटले जाते. काश्मिरी कन्या सुनंदा पुष्कर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्या ‘ट्विटर युद्धा’मुळे थरूर दांपत्यामधील वाद चव्हाट्यावर आला होता. शशी थरूर आणि मेहर तरार यांच्यातील अत्यंत खासगी संदेश सुनंदा पुष्कर यांनी थरूर यांच्या टाइमलाइनवर पोस्ट केला. या दोघांमधील संभाषण गुरुवारी ट्विटरवर येताच भडका उडाला. दिवसभर मीडियावर तुफान चर्चा झाल्यानंतर थरूर दांपत्याने संयुक्त पत्रक काढून आपल्यातील संबंधात तणाव नसल्याचेही जाहीर केले होते.
मेहर यांचे वादग्रस्त ट्विट
आय लव्ह यू शशी थरूर. कधीही न संपणारे. हमेशा. घायाळ, पण नेहमीच तुझीच मेहर.
हा प्रेमसंवाद सुरू पाहून भडकलेल्या सुनंदा यांनी हा प्रेमसंवाद ट्विटरवर टाकल्यानंतर शशी थरूर यांनी आपले अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता; परंतु सुनंदा यांनी तत्काळ आपल्या पतीचे अकाऊंट हॅक झाले नसल्याचे सांगून मेहर तरार आपल्या पतीचा कसा पिच्छा पुरवते आहे व दोघांमध्ये कसे अफेअर सुरू आहे हे दर्शवण्यासाठी मीच ते ट्विट टाकले, असा खुलासा केला होता. मेहर हिने गतवर्षी एप्रिल महिन्यात थरूर यांची मुलाखत घेतली होती. त्या वेळेसपासून दोघांमध्ये काही तरी काळेबेरे असल्याचा संशय सुनंदा यांना होता.
स्वीट कॅपिटल ! : कोची आयपीएल टीमची खरेदी केल्यानंतर सुनंदा पुष्कर प्रसिद्धीच्या झोतात आल्या. 70 कोटी रुपये देऊन थरूर यांनी संघ खरेदी केला. संघाच्या खरेदीमध्ये पत्नी सुनंदा यांचा सर्व वाटा होता. त्यामुळे त्यांनी पत्नीला उद्देशून ‘सुनंदा म्हणजे स्वीट कॅपिटल’ असे म्हटले होते.
काश्मिरी कन्येची शोकांतिका
जन्म -1 जानेवारी 1962 (बोमाई, काश्मीर)
वडील -लेफ्टनंट कर्नल पी. एन. दास
शिक्षण-पदवीधर, महिला महाविद्यालय श्रीनगर
विवाह- तीन
अपत्य- एक मुलगा, शिव मेनन (वय 21)
व्यवसाय- सेल्स डायरेक्टर, रिअल इस्टेट कंपनी टेकॉम (दुबई), कोची आयपीएल संघात 70 कोटींची गुंतवणूक.
अखेरचे ट्विट शुक्रवारी पहाटे 5.27 वाजता
जो होना है वो होके रहेगा,
हसते हुए जायेंगे
तिसरा विवाह
सुनंदा पुष्कर यांचे पूर्वायुष्यात दोन विवाह झाले होते. त्यांचा पहिला विवाह काश्मीरचे संजय रैना यांच्याशी झाला होता; परंतु त्यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर केरळचे उद्योगपती सुजित मेनन यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. परंतु दुर्दैवाने 1997 मध्ये त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला. मेनन यांच्यापासून त्यांना मुलगा झाला. त्यानंतर 2010 मध्ये सुनंदा आणि शशी थरूर यांचा विवाह झाला होता.
कुटुंब लँडलॉर्ड
सुनंदा मूळच्या काश्मिरी. अतिशय धनाढ्य कुटुंबात जन्मलेल्या सुनंदा यांचे वडील लष्करात होते. त्यांना दोन भाऊ आहेत.
विमानतळावर गोंधळ
सुनंदा आणि शशी थरूर यांच्या विवाहानंतर दोघेही कायम चर्चेत राहिले. 30 ऑक्टोबर 2012 रोजी तिरुवनंतपुरम विमानतळावर सुनंदा यांनी एका व्यक्तीच्या कानशिलात लगावली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेत असताना संबंधित व्यक्तीने आपल्याला स्पर्श केल्याचा आरोप करून त्यांनी त्याच्या कानाखाली वाजवली होती.
जाणून घ्या कोण आहे मेहर....पुढील स्लाईडवर क्लिक करा...