आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरुर, तरार आणि थरार; सुनंदा पुष्कर यांचा यू-टर्न, आमच्यात सर्व काही व्यवस्थित !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवी दिल्ली - केंद्रीय राज्यमंत्री शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनी त्यांच्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिणीशी केलेल्या बातचीतमध्ये त्यांनी आमच्यात कोणताही मतभेद नसल्याचे म्हटले आहे. मात्र, मेहर तरार यांच्यावरील हल्ला त्यांनी कायम ठेवला आहे. मेहर यांच्याबद्दल पुष्कर म्हणाल्या, 'एक मुलगी आहे मेहर तरार, तिने थरुर आणि माझे अकाऊंट हॅक केले आहे. थरुर यांची मला काळजी वाटते, कारण ती (मेहर तरार) आयएसआय एजंट आहे. आमच्यात (शशी थरुर-सुनंदा पुष्कर) सर्वकाही व्यवस्थित असून कोणतेही मतभेद नाहीत. हे एक गंभीर प्रकरण आहे. मी तिला तुरुंगात डांबल्याशिवाय राहाणार नाही. मी भारतीय आणि पाकिस्तानी दुतावासांशी संपर्क करणार आहे. तिला आयएसआयने भारतात प्लांट केलेले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ती भारतात आली होती आणि तिने माझ्या पतीची मुलाखत घेतली होती. तेव्हापासून ती त्यांच्या मागे आहे. ती आयएसआयची एजंट असल्याची माहिती मला माझ्या पाकिस्तानातील सुत्रांनी दिली आहे. '
याआधी सुनंदा पुष्कर यांनी एका इंग्रजी दैनिकाशी केलेल्या बातचीतमध्ये पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत शशी थरुर यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला होता. एवढ्यावरच त्या थांबल्या नव्हत्या तर त्यांनी घटस्फोटाची मागणी करणार असल्याचेही म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याने शशी थरुर पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनी त्यांच्या पतीचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले नसल्याचे सांगून सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यांनी दावा केला आहे, की पतीचे ट्विटर अकाऊंट त्या स्वतः हताळत होत्या. पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार कशा माझ्या पतीच्या मागे लागल्या आहेत, त्यांचे हे कारस्थान समोर आणण्यासाठी मी स्वतः ते मॅसेज केले असल्याचा त्यांनी दावा केला आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, 'आमचे ट्विटर अकाऊंट हॅक झालेले नाहीत. त्यांच्या (शशी थरुर) अकाऊंटवरुन मी ट्विट करत होते. ती (मेहर तरार) पाकिस्तानच्या आयएसआयची एजंट असून ती माझ्या पतीच्या मागे लागली आहे. हे मी कसे सहन करणार? आणि तुम्हाला तर माहित आहे, की पुरुष कसे असतात.' सुनंदा यांच्या या वक्तव्या आधी थरुर यांनी त्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला होता. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मेहर तरार यांच्यासंबंधी अनेक वादग्रस्त ट्विट केले गेले होते. थरुर यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन मेहर तरार यांना रोमँटिक आणि वादग्रस्त मॅसेज पाठवण्यात आले होते.
पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचे सांगत म्हटले आहे. त्या म्हणाल्या, मी 13 वर्षीय मुलाची आई असून शशी थरुर यांच्यासोबत माझे कोणतेही संबंध नाहीत. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, की मी पाकिस्तानात राहून शशी थरुर यांच्या मागे कशी लागू शकते. तसेच, पाकिस्तानच्या आयएसआयच्या एजंट असल्याच्या आरोपावर त्या म्हणाले, याबद्दल मी सुनंदा यांच्याविरोधात दावा दाखल करणार आहे.

पुढील स्लाइडमध्ये, तरार - सुनंदा यांचे ट्विटर वॉर आणि वाचा थरुर यांच्या अकाऊंटवरील काढून टाकण्यात आलेले वादग्रस्त ट्विट