आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Murder Case Delhi Police Questions Amar Singh And Shiv Menon

सुनंदा मर्डर केसः अमर सिंह यांची दोन तास चौकशी, विचारले गेले 20 प्रश्न!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी माजी सपा नेते अमर सिंह यांची आज चौकशी केली. चौकशीनंतर अमर सिंह यांनी सांगितले की, 'दिल्ली पोलिसांच्या चौकशी पथकाने माझी दोन तास माझ्याशी बातचित केली. मी शशी थरूर यांचा आदर करतो. सुनंदा यांच्याबाबत मला जी काही माहिती होती ती सर्व मी पोलिसांना दिली आहे. याबाबत सांगितले जात आहे दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाने अमर सिंह यांना 20 प्रश्न विचारले. त्याआधी पोलिसांनी सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन यालाही चौकशीसाठी बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिव मेनन याचीही चौकशी करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी सुनंदा मर्डर केस प्रकरणात आयपीएलशी संबंधित चौकशी केली.
अमर सिंह यांच्याशी दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीबाबत दिल्ली पोलिसचे कमिश्नर बीएस बस्सी यांनी सांगितले की, ''अमर सिंह यांनी दावा केला होता की या प्रकरणाची त्यांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्यांची चौकशी केली. आपल्याला माहित असेलच की दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत अनेक लोकांची चौकशी केली आहे. यात शशी थरूर, दोन पत्रकार आणि थरूर यांच्या एका नोकराचाही समावेश आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील एका हॉटेलात सुनंदा पुष्कर या मृत आढळून आल्या होत्या.
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर अमिर सिंह यांनी एका चॅनेलशी बोलताना दावा केला होता की, सुनंदा आयपीएल प्रकरणावरून काही तरी खुलासा करणार होती. याच प्रकारचा दावा पत्रकार नलिनी सिंह यांनीही केला होता. नलिनी सिंह यांची पोलिसांनी मागील काही दिवसापूर्वी चौकशी केली आहे. नलिनी सिंह यांनी पोलिसांना सांगितले होते की, सुनंदा यांनी जेव्हा शेवटची माझ्याबरोबर बोलली तेव्हा आयपीएलबाबत सर्व दोष आपल्यावर घेतला होता.