आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar And Shashi Tharoor Had A Bitter Spat On January 15

शेवटचे तीन दिवस सिगारेट-नारळपाणी पित होत्या सुनंदा, सोफ्यावर काढली होती थरुर यांनी रात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या चितेची आग अजून थंडही झाली नाही तर, त्यांच्या मृत्यूआधी थरुर आणि त्यांच्यातील तणाव व भांडण समोर आले आहे. शशी थरुर यांच्या घरातील नोकर नारायण याने पोलिस चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूआधी एक दिवस म्हणजे गुरुवारच्या रात्री शशी थरुर त्या हॉटेलच्या रुममध्ये सोफ्यावर झोपले होते. विमानतळावरून सुनंदा सरळ हॉटेलमध्येच गेल्या होत्या. मृत्यूआधी तीन दिवस त्या केवळ सिगारेट ओढत होत्या आणि नारळपाणी घेत होत्या.
आणखी एक माहिती पोलिसांनी मिळाली आहे. तिरुअनंतपुरमहून विमानाने दिल्लीकडे येत असताना थरुर आणि सुनंदा यांच्यात जोरदार भांडण झाले होते. दोघांच्या भांडणामुळे इतर प्रवाशीही त्रस्त झाले होते. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतरही दोघांमधील भांडण थांबले नव्हते.
सुत्रांच्या माहितीनुसार, थरुर आणि सुनंदा यांच्यातील सार्वजनिक ठिकाणी झालेल्या भांडणाचे साक्षीदार केंद्रीय मंत्री मनिष तिवारी होते. थरुर व सुनंदा ज्या विमानातून प्रवास करीत होते, त्याच विमानात मुंबईतून मनिष तिवारी प्रवास करीत होते. अशीही माहिती आहे, की सुनंदा आणि थरुर यांच्या जवळच्या सीटवर तिवारी बसलेले होते. त्यांनी दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिवारींच्या निकटवर्तींयसुत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी या भांडणात हस्तक्षेप केला नव्हता.

पुढील स्लाइडमध्ये, सुनंदांचे शेवटचे तीन-चार दिवस अत्यंत तणावग्रस्त