आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Become Irritated On Minor Issue, Relative Said To Dainik Bhaskar

क्षुल्लक गोष्टींवरून चढत होता सुनंदा पुष्करांचा पारा,निकटवर्तीयांनी दैनिक भास्करला दिली माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर खूप आजारी होत्या. त्वचा, किडनी, पोटाचा टीबी आणि ऑटो इम्युन सिस्टिमच्या आजारामुळे त्या त्रस्त होत्या. दिल्लीला येण्याच्या अगोदर त्यांना केरळ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (किम्स) हॉस्पिटलमध्ये तीन दिवस दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान त्यांनी नैराश्यामध्ये ट्विट केले होते- मला किम्समध्ये नानाविध आजार जडल्याचे सांगितले आहे. या जगाचा कधी निरोप घेईन सांगता येत नाही. मात्र, मी हसत अलविदा करीन.
गंभीर आजार : सुनंदा यांच्या केरळ प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत राहिलेल्या नादिरा यांनी सांगितले की, ल्यूपस हा असा आजार आहे, ज्यात शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात. प्रमाण एवढे जास्त असते ज्यामुळे शरीरातील अन्य पेशी मारल्या जातात. या आजारात मद्य पिणे वर्ज्य असते. मात्र, सुनंदा खूप तणावात होत्या. त्यामुळे त्यांनी खूप दारू प्यायली असावी.
लहानसहान गोष्टीवर रागावत : घरात लहानसहान गोष्टीवर त्या एकदम भडकत असत. या स्वभावामुळे घरातील नोकर त्यांना खूप भीत होते. गेल्या आठवड्यात त्या पद्मनाभ मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या. नादिरा म्हणाली, तिथे काही जणांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली होती. यावर सुनंदा यांनी मोठ्या स्वरात सुनावल्यानंतर थरूर यांनाही काही करता आले नाही. याआधी नऊ जानेवारी रोजी एका पार्टीदरम्यान दुबईच्या खलीज टाइम्सचे पत्रकार मौज शाहबंदी यांच्याशी सुनंदा यांची कुरबूर झाली. शाहबंदी यांनी थरूर यांच्या मुलाखतीचा प्रस्ताव ठेवला होतो. सुनंदा अचानक खवळल्या आणि माध्यमांचा मी तिटकारा करते, असे त्या म्हणाल्याचे शाहबंदी यांनी सांगितले. मृत्यूच्या आदल्या दिवशी त्या अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांशी बराच वेळ बोलल्या ही गोष्ट वेगळी.
व्यावसायिक दृष्टी : दुबईमध्ये सुरुवातीच्या काळात सुनंदा स्पा आणि ब्यूटिपार्लर चालवत होत्या. तिथे त्यांचा सेलिब्रिटी ब्यूटिशियन असा लौकिक होता. यानंतर त्यांनी टीकॉम इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी सुरू केली. त्यांचे कौटुंबिक मित्र जॉय यांच्या म्हणण्यानुसार, भरपूर पैसे कमावून भरपूर खर्च करण्याची त्यांची इच्छा होती. शाही राहणीमान, खर्चाची त्यांना सवयच झाली होती. दुबईत त्यांनी नंदकुमार राधाकृष्णन यांच्याशी मैत्री केली होती. यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले व अनेक व्यवसायांत एकत्र भागीदारी केली.
पतीबाबत असुरक्षितता : एक यशस्वी महिला उद्योजक असतानादेखील त्यांच्यात पतीवरून असुरक्षितता जाणवत होती. शशी थरूर यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्या याच कारणामुळे जात होत्या, असे सुनंदा यांची मैत्रीण फराहअली खान यांचे म्हणणे आहे. बरे वाटत नसले तरी त्या जात होत्या. थरूर यांना सोमवारी सलमान खुर्शीद यांची पत्नी लुई यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभास जावयाचे होते. प्रकृती बरी नसतानाही सुनंदा यांची थरूर यांच्यासोबत जाण्याची इच्छा होती.