आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Case: Police Questioned Shashi Tharoor

सुनंदाप्रकरणी थरुरांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती, विचारले ५० हून जास्त प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : पोलिस ठाणे असेच असते : शशीथरूर गुरुवारी वसंत विहार पोलिस ठाण्यात पोहोचले. ही त्यांची तिसरी वेळ आहे.
नवी दिल्ली - पत्नीसुनंदा पुष्कर हत्याकांडात काँग्रेस खासदार शशी थरूर अडकण्याची चिन्हे आहेत. एसआयटीने गुरुवारी दोन वेळा त्यांची चौकशी केली. आधी सकाळी ११.३० वाजता बलावले. तेव्हा पोलिसांनी त्यांना पाच तास प्रश्न विचारले.
थरूर यांच्याबरोबरच आणखी पाच लोकांनाही एसआयटीने बोलावले होते. थरूर यांचा नोकर बजरंगी नारायण सिंह, मित्र संजय दिवाण, स्वीय सहायक प्रवीण कुमार ह्रदयरोगतज्ज्ञ रजत मोहन यांना समोरासमोर बसवून चौकशी झाली. त्यानंतर थरूर यांना सोडून देण्यात आले. मात्र या पाच जणांची चौकशी सुरूच होती. त्यात अनेक नवीन तथ्यांवर प्रकाश पडला. थरूर आजवर दडवू पाहत असलेल्या गोष्टीही उजेडात आल्या. त्यातच रात्री साडे दहा वाजता त्यांना पुन्हा वसंत विहार ठाण्यात बोलावण्यात आले. यावेळी त्यांची सुमारे दोन तास चौकशी करण्यात आली.
मागच्या वर्षी १५ जानेवारी रोजी थिरूवनंतपूरमहून दिल्लीला परतल्यावर असे काय घडले की, सुनंदा तुम्हाला विमानतळावरच सोडून गेल्या ? अशी विचारणा एसआयटीने केली. याखेरीज थरुरांना ५० हून जास्त प्रश्न विचारण्यात आले. गेल्या चार आठवड्यातील थरूर यांची ही तिसरी चौकशी आहे.फेब्रुवारी रोजी एसआयटीने सुनंदाचा मुलगा शिव मेनन याचीही चौकशी केली होती.
पुढे वाचा, आयपीएल वादाबाबतही विचारले तिखट प्रश्न