आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुनंदा मर्डर केस: नव्याने पुरावे गोळा करण्यासाठी हॉटेलात गेली एक्स्पर्टसची टीम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर यांच्या मृत्युप्रकरणात शुक्रवारी फॉरेन्सिक एक्स्पर्टसची (CFSL)टीम पुरावे गोळा करण्यासाठी लीला पॅलेसमध्ये पोहोचली. दिल्ली पोलिसांनी नव्याने तपासाचे आदेश देण्यासाठी पतियाळा हाऊस कोर्टाला परवानगी मागितली होती. यावर कोर्टाने 4 सप्टेंबर रोजी अहवाल देण्याचे आदेश दिले होते. तत्पूर्वी, तपासात उशीर आणि तब्बल 3 वर्षे हॉटेलची रूम सील ठेवण्यावर कोर्टाने अनेक वेळा पोलिसांना फटकारले होते. तथापि, जानेवारी 2014 मध्ये माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा यांचा मृतदेह हॉटेलच्या रूममध्ये आढळला होता. एका वर्षाच्या तपासानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
 
हायकोर्टाने काय म्हटले?
- दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी तपासाचा वेग कमी करण्यावर नाराजी जाहीर केली होती. जस्टिस जीएस सिस्तानी आणि जस्टिस चंद्रशेखर यांच्या पीठाने पोलिसांना खडसावत म्हटले की, जानेवारी 2014 मध्ये ही घटना झाली, परंतु अजूनही तुम्ही कोणताही अहवाल दाखल केला नाही. 3 वर्षे तुम्ही नेमके काय केले, याची माहिती आम्हाला द्या. तुमचा तपास कुठपर्यंत पोहोचलाय? प्रत्येक बाब तुम्हाला स्पष्ट करावी लागेल. 
 
सुनंदा यांचा मुलगा काय म्हणाला होता?
- भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कोर्टाच्या निगराणीत सीबीआय आणि इतर तपास संस्थांची मिळून एक एसआयटी स्थापन करण्याची मागणी करत याचिका दाखल केली आहे. त्यांचा दावा आहे की, अनेक रिपोर्टसनुसार सुनंदा यांचा मृत्यू नॉर्मल नसल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे.
- दुसरीकडे, थरूर यांचे सावत्र पुत्र शिव मेनन यांनी कोर्टाला एका वेळमर्यादेत तपास करण्याची मागणी केली असून स्वामी यांची याचिका म्हणजे पॉलिटिकल स्टंट असल्याचे म्हटले होते.

केव्हा झाला होता सुनंदा यांचा मर्डर?
- 17 जानेवारी 2014 रोजी रात्री दक्षिण दिल्लीच्या हॉटेलमध्ये संशयास्पदरीत्या सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत बेडवर आढळला. दिल्ली पोलिसांनी तपास सुरू केला आणि वर्षभरानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला.
- सुनंदा यांच्या मृत्यूच्या हायप्रोफाइल प्रकरणात शशी थरूर यांचीही चौकशी झालेली आहे. एम्सच्या व्हिसेरा रिपोर्टनुसार, सुनंदा यांच्या शरीरात कोणतेही विष आढळलेले नाही. पोलिसांनी याप्रकरणी काँग्रेस नेते थरूर यांची दीर्घ चौकशी केली होती.
बातम्या आणखी आहेत...