नवी दिल्ली -
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या कारणांबाबत एम्सचा नवा अहवाल अपूर्ण आहे. त्यामुळे कुठल्याही निष्कर्षांपर्यंत पोहोचता येऊ शकत नाही, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नव्याने चौकशी शक्य आहे.
सुनंदा यांचा मेंदू, किडनी, फुप्फुस, यकृत सामान्य पद्धतीने काम करत होते. त्यांचा मृत्यू विषामुळे झाला होता, असे अहवालात म्हटले होते.