आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Death Due To Overdose Of Medicines Postmortam

सुनंदा पुष्‍कर यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनाने, शवविच्छेदनात स्पष्‍ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू औषधांच्या अतिसेवनामुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. ‘एम्स’च्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीरकुमार गुप्ता यांनी उपविभागीय दंडाधिकारी आलोक शर्मा यांच्याकडे अहवला सोपवल्याचे सांगितले.
अहवालानुसार सुनंदा नशेत नव्हत्या. त्यांच्या चेहरा व हातांवर दहावर लहान जखमा होत्या. नैराश्यावरील औषध अल्फ्राझोलमच्या ओव्हरडोसने त्यांचा मृत्यू झाला असावा. तज्ज्ञांच्या मते ओव्हरडोसने मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊन माणूस बेशुद्ध पडू शकतो. प्रसंगी मृत्युचाही धोका असतो.