आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Death Issue, Delhi Police Files Murder Case

ती आत्महत्या नव्हे? सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केला खुनाचा गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - संग्रहित
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणाने आणखी एक धक्कादायक वळण घेतले आहे. सुनंदा पुष्कर यांनी नेमकी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली या मुद्यावर बराच दिवसांपासून खल सुरू असताना, आता दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केल्याने पुन्हा या मुद्यावर नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत.

दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी ही माहिती दिली. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. पण त्यानंतर शंका व्यक्त करण्यात आल्याने, त्यांनी खरंच आत्महत्या केली होती, की त्यांची हत्या करण्यात आली होती, याचा तपास घेण्यासाठी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात केलेल्या या चाचण्यांच्या वैद्यकीय अहवालावर आधारीत तथ्यांचा अभ्यास केल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला असल्याचे बस्सी म्हणाले आहेत.

सुनंदा यांचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता तसेच विषबाधेमुळे हा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले होते. पण तरीही अद्याप वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या लाळेच्या नमुण्याचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. गेल्यावर्षी 17 जानेवारी रोजी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आढळला होता. त्यापूर्वी सुनंदा पुष्कर आणि पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. शशी थरूर आणि तरार यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चाही होत्या. त्यांच्यातील ट्वीटचे प्रकरणही बरेच गाजले होते.