आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Death Not Natural, Accident, Doctors Observation After Postmartam

सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू अनैसर्गिक, शवविच्छेदनानंतर डॉक्टरांचा निष्कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीतील हॉटेलमध्ये झालेला मृत्यू नैसर्गिक नसल्याच्या निष्कर्षावर डॉक्टर पोहोचले आहेत. ‘एम्स’मधील तीन डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदनानंतर हे मत मांडले. न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून दोन-तीन दिवसांत सविस्तर अहवाल आल्यावर खरे कारण कळू शकेल. डॉक्टरांच्या मते सुनंदांचा मृत्यू आकस्मिक (सडन डेथ) झालेला आहे. सूत्रांनुसार सुनंदांच्या शरीरात विषाचा अंश सापडलेला नाही. मात्र, शरीरावर जखमा आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुनंदांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा शिव मेनन याने चितेला मुखाग्नी दिला.
थरूर काही वेळ आयसीयूत
शनिवारी पहाटे थरूर यांना छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यावर ‘एम्स’मध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले. दुपारनंतर त्यांना सुटी देण्यात आली. त्यांना मधुमेह आहे. राजनैतिक अधिकारी ते नेता, असा प्रवास करणारे थरूर यांनी सुनंदांशी 3 वर्षांपूर्वी विवाह केला होता. पत्रकार मेहरशी त्यांच्या संबंधांवरून सुनंदा अस्वस्थ होत्या.
तपास या 3 दिशांनी
1 शशी थरूर हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर सुनंदांच्या खोलीत कोण-कोण आले.
2 हॉटेलचे कर्मचारी व सुनंदांच्या नोकराचीही कसून चौकशी. पोलिस थरूर यांचा आज जबाब नोंदवणार.
3 आत्महत्येची शक्यता पाहता त्या दिशेनेही होणार तपास.
विमानातही थरूर-सुनंदा यांच्यात झाला होता वाद
कोचीहून दिल्ली येताना विमानातही दोघांत प्रचंड वाद झाला होता. नंतर हॉटेलातही त्यांची बाचाबाची झाली.
पत्रकार मेहर व थरूर यांच्यातील ई-मेल संवाद व प्रेमसंबंधांच्या संशयावरून सुनंदा होत्या प्रचंड तणावात
28 जुलै 2013 रोजी मेहरने शशी थरूर यांना केलेला एक ई-मेल प्रकाशझोतात आला. याच दिवशी थरूर यांनीही मेलचे उत्तर दिले होते. सुनंदांना असलेल्या संशयाबद्दल मेलमध्ये दोघांचा संवाद होता. ट्विटरवरील थरूर-सुनंदा यांच्यातील वादानंतर शनिवारी हा मेल वेब जगतात प्रचंड चर्चिला गेला.
प्रेमा तुझा रंग कसा... मेहरचा मेल
तुमच्या मैत्रीवर गर्व.. माझ्या जीवनात आलात, शुक्रिया...
थरूर... तुमच्या जीवनात जे घडते आहे त्याबद्दल दु:ख वाटते. आपण तर दोन भेटीतच मित्र झालोत. याचा मला अभिमानही आहे. थँक्यू शशी... माझ्या जीवनात आल्याबद्दल. पुरुष आणि स्त्रीच्या मैत्रीवर नेहमीच संशय घेतला जातो.
उत्कटताही... थरूर यांचे उत्तर
आपण दोघांनी भेटावे हे सुनंदाला आवडत नाही
मेहर... तुझ्या भावनांबद्दल आभारी आहे. मोजक्या क्षणांतच आपण मित्र झालोत. माझेही तिच्यावर खूप प्रेम आहे, पण तिचा विश्वासच नाही. आपले भेटणे तिला आवडत नाही. मी तुझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही तर तू माझ्या भावना समजून घेशील, अशी आशा वाटते. एक दिवस आपण तिघे एकत्र बसून पेच सुटेल एवढीच आशा.