आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लीला हॉटेलच्या महाराजा सुइटचे दिवसाचे भाडे आहे तब्बल 5 lacs रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीच्या चाणक्यपुरी परिसरात भारतातील सर्वांत आलिशान लीला पॅलेस हॉटेल आहे. केंद्रीय मंत्री शशी थरूर आणि त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर याच हॉटेसमध्ये थांबले होते. सुनंदा पुष्कर यांचा याच हॉटेलमधील सुइट क्रमांक 345 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. शशी थरूर यांनी 342 क्रमांकाचा आणखी एक सुइट बुक केला होता. या हॉटेलमध्ये महाराजा नावाचा एक सुइट आहे. तो सर्वांत महागडा आहे. त्याचे एका दिवसाचे भाडे तब्बल 5 lacs रुपये आहे. भारतातील शानदार आणि महागड्या हॉटेल्सचा विचार केल्यास लीला पॅलेस सर्वांना मात देणारे हॉटेल आहे.
मुंबईच्या प्रसिद्ध लीला हॉटेल समुहाच्या मालकिचे हे हॉटेल आहे. यासाठी 700 कोटी रुपये खर्च करून चाणक्यपुरी परिसरात जागा विकत घेण्यात आली. त्यानंतर 900 कोटी रुपये खर्च करून या पंचतारांकीत हॉटेलचे बांधकाम करण्यात आले. यात एकूण 260 सुइट आहेत. या हॉटेलच्या एका खोलीच्या निर्माण कार्यावर तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. इतर पंचतारांकीत हॉटेल्सचा विचार केल्यास एका खोलीच्या निर्माण कार्यावर 75 लाख ते 1.8 कोटी रुपये खर्च येतो.
या हॉटेलच्या निर्माण कार्यावर आलेला खर्च भरून काढण्यासाठी सुइटचे किमान भाडे 22,000 रुपये असणे गरजेचे आहे. परंतु, येथील शानदार सुइटचे प्रति दिवस भाडे तब्बल 5 लाख रुपये आहे. इतर सुइटचे भाडेही जवळपास सारखेच आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या लीला हॉटेलची खासियत...