आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Pushkar Murder Case Inquiry From Journalist By Delhi Police SIT

मुठभर टॅबलेट्‍स सेवन करत होत्या सुनंदा पुष्कर; आता पत्रकारांची चौकशी होणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर एका वेळेला जवळपास मुठभर टॅबलेट्‍स सेवन करत होत्या, असा धक्कादायक दावा थरूर दाम्पत्याच्या एका म‍ित्राने दावा केला आहे. तेज सराफ असे या व्यक्तीचे नाव आहे. दुसरीकडे, सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी आता पत्रकारांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुनंदा यांनी मृत्यूपूर्वी काही पत्रकारांशी संवाद साधला होता. विशेेष चौकशी समिती (एसआयटी) आता संबंधित सर्व पत्रकारांची चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सां‍गितले.
एसआयटीने आपल्याला आज (गुरुवारी) चौकशीसाठी बोलावले असल्याचे एका खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने 'ट्विटर'द्वारा सांगितले आहे. तसेच दोन महिला पत्रकारांनाही बोलावण्यात येणार आहे.

दुसरीकडे, थरूर दाम्पत्याचे मि‍त्र तेज सराफ यांनी सुनंदा मुठभर टॅबलेट्‍स सेवन करत असल्याचे म्हटले आहे. थरूर दाम्पत्य डिसेंबर 2013 मध्ये गोव्यात आले होते. गोव्यात थरूर दाम्पत्य तेज सराफ यांच्या बंगल्यावर थांबले होते. तेव्हा त्यांच्यासमोर सुनंदा यांनी जवळपास मुठभर टॅबलेट्‍स सेवन केले. झोप येत नसल्याने एल्प्रॅक्स आणि अनेक पेनकिलर अनेक वर्षांपासून खात असल्याचे सुनंदा यांनी सराफ यांना सांगितले होते.

शशी थरुर यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार?
सुनंदा पुष्कर यांचे पती आणि कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी थरूर यांना दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, थरुर यांनी एसआयटीला समाधानकारक माहिती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात अाली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सुनंदा पुष्कर यांच्या लॅपटॉप, मोबाइलची फोरेन्सिक चाचणी