आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 PICS: या अंदाजामुळे कायम चर्चेत राहात होत्या सुनंदा पुष्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जो पर्यंत जगली तो पर्यंत शानशौकीत सुनंदा यांनी आयुष्य घालवले आणि मृत्यूही असा, की त्याचेही गुढ कायम ठेवून त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेम, वाद आणि ग्लॅमर या तिन्ही गोष्टी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या राहिल्या आहेत. सुनंदा पुष्कर यांचे आयुष्य कोणापासूनही लपून राहिलेले नाही. त्या ज्या पद्धतीने लाइमलाइटमध्ये राहात होत्या त्यावरून अँदाज लावता येतो, की त्या किती हाय प्रोफाइल होत्या. जम्मुमध्ये जन्मलेल्या सुनंदाने दुबईमध्ये पाय रोवले आणि स्वतःच्या नावाला वलय प्राप्त केले.
दुबईमध्ये ब्यूटिशियन असलेल्या सुनंदा यांची हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये चांगली ओळख होती. बॉलिवूडमधील पार्टी असेल नाही तर, राजकीय कार्यक्रम त्या त्यांच्या ग्लॅमरस लुकमुळे सगळीकडे चर्चेत राहात होत्या. ग्लॅमरस राहाणे त्यांना विशेष आवडत होते. त्यांच्या ग्लॅमरस लुकपुढे बॉलिवूडच्या अ‍ॅक्ट्रेसही फिक्या पडत होत्या. त्यांच्या चेह-यावरील कायम स्मित हास्य, हे देखील त्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत होते. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड, उद्योगजगतासह राजकीय क्षेत्रातूनही शोक व्यक्त होत आहे. अनुपम खेर, विजय मल्ल्या यांनी त्यांच्या मृत्यूनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. तर, पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी देखील त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे, मी देखील रडत आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ग्लॅमर जगतातही किती प्रसिद्ध होत्या सुनंदा पुष्कर