नवी दिल्ली - एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता त्यांनी लावलेल्या आरोपांवर ठाम आहेत.
सुनंदा पुष्कर यांच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधील तथ्ये बदलण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप गुप्ता यांनी केला होता. मात्र ,सुधीर गुप्ता यांच्या आरोपानंतर एम्सने पत्रकार परिषद घेऊन अशा प्रकारचा कोणताही दबाव नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
दरम्यान, माझ्यावर दबाव होता किंवा नाही, हे एम्सला कसे समजले असा प्रतिप्रश्न करत आपले आरोप खरे असल्याचे गुप्ता गुरुवारी म्हणाले आहेत. माझ्यावर दबाव नसल्याचे स्पष्ट करणारे ते कोणे? तसेच त्यांना एवढ्या घाईत लगेचच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देण्याची काय गरज? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
.
मी आजवर केवळ सुनंदा पुष्कर यांच्याच नव्हे तर अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये पोस्ट मॉर्टम रिपोर्ट तयार केले आहेत. मात्र कधीही कोणत्याही दबावाला बळी पडलो नव्हतो, असेही सुधीर गुप्ता यावेळी म्हणाले.
फोटो - डॉ. सुधीर गुप्ता