आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunanda Want To Talk On IPL, Journalist Nalini Singh Tells Delhi Police

पत्रकार नलिनी म्हणाली, मृत्यूपूर्वी IPL बाबत खुलासा करणार होती सुनंदा पुष्कर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - सुनंदा पुष्कर - Divya Marathi
फोटो - सुनंदा पुष्कर
नवी दिल्ली - काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर हत्या प्रकरणी तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी वरिष्ठ पत्रकार आणि सुनंदा यांच्या मैत्रिण नलिनी सिंह यांची चौकशी केली. चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना नलिनी म्हणाल्या की, सुनंदा यांना मृत्यूपूर्वी IPL बाबत काहीतरी बोलायचे होते.

नलिनी म्हणाल्या, जेव्हा मी सुनंदा यांना टिव्हीवर बोलायचे आहे का, असे विचारले त्यावर मात्र सुनंदा काहीही बोलल्या नाही. आपण सर्व आरोप स्वतःवर घेतले होत, त्यामुळे आता बोलायचे असल्याचे सुनंदा नलिनी यांना म्हणाल्या होत्या. नलिनी म्हणाली की, ज्यादिवशी सुनंदाचा मृत्यू झाला त्या दिवशी आमच्या दोघींचे बोलणे झाले होते. त्यामुळे ाझी चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांना दोघींत काय बोलणे झाले याचा तपशील आणि सुनंदा यांच्या बोलण्याचा टोन कसा होता, हे जाणून घ्यायचे होते, असे नलिनी म्हणाल्या. सुनंदा यांच्याशी मृत्यूपूर्वी ज्या चार व्यक्तींचे बोलणे झाले होते, त्यांच्यापैकीच सुनंदा या नलिनी या एक आहेत.
80 मिनिटे झाली चर्चा
या प्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी शशी थरूर यांचीही चौकशी केली होती. शुक्रवारी नलिनी यांची चौकशी करताना दिल्लीचे पोलिस आयुक्त बीएस बस्सी म्हणाले की, या प्रकरणी ज्या कोणाकडे काहीही माहिती असेल तर ती आम्ही मिळवत आहोत. डीसीपी प्रेमनाथ यांच्या नेतृत्त्वातील तपास पथकाने शुक्रवारी सरोजनी नगर पोलिस ठाण्यात नलिनीची चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या मते नलिनी सिंह यांच्याकडून इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) अँगलबाबत माहिती घेण्यात आली. या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी पत्रकार राहुल कंवर याची चौकशीही केली होती. सुनंदा राहुल कवंर यांना एख मुलाखत देऊ इच्छित होत्या, त्यात त्या अनेक खुलासे करणार होत्या, असे म्हटले जाते. आणखी काही पत्रकारांना या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.