आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी : मोबाइल जगातील सर्वाधिक शक्तिशाली व्यक्तिमत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर पिचई: गुगलचे वरिष्ठ उपाध्यक्ष व अँड्रॉइड विभागप्रमुख
जन्म 1972- चेन्नई

कुटुंब : आई स्टेनोग्राफर होती. वडील-रघुनाथ पिचेई हे ब्रिटिश कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते. एक भाऊ. पत्नी-अंजली. एक मुलगी व एक मुलगा.

शिक्षण : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून बीई, स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमएस, पेनसिल्वेनिया-व्हॉटसन स्कूलमधून एमबीए.
त्यांनी नुकतीच मल्टिपल डिव्हाइसेसमध्ये अँड्रॉइड लाँच करण्याची घोषणा केली आहे. गुगलचे सीईओ लॅरी पेज यांच्यानंतर सुंदर पिचई हे कंपनीचे दुसरे महत्त्वाचे व्यक्ती आहेत.
सुंदर पिचई यांचा जन्म खूप साध्या कुटुंबात झाला. आई-वडील व भावासोबत ते बालपणी दोन खोल्यांच्या घरात राहायचे. अनेक वर्षे त्यांच्याकडे टीव्ही नव्हता. वडिलांकडे जुनी स्कूटर होती. त्यावर चौघेजण बसून फिरायला जात असत. सुंदर यांचे वडील दररोज घरी परतल्यावर संपूर्ण दिवसभरात त्यांनी कोणत्या आव्हानांना तोंड दिले, हे सर्व मुलांना समजावून सांगत असत. त्यांचे काम इलेक्ट्रॉनिक्सचे असल्यामुळे सगळी चर्चा तंत्रज्ञानाधारित होती. तेव्हापासूनच सुंदर यांना तंत्रज्ञानात आवड निर्माण झाली. ते रोज संध्याकाळी वडील येण्याची वाट पाहत असत व विविध प्रश्न विचारत असत. सुंदर 12 वर्षांचे असताना त्यांच्या घरी टेलिफोन आला. त्यांची आई सांगते, ‘सुंदरने एकदा डायल केलेला नंबर पुन्हा कधीही विसरत नसे. फोनच्या तंत्रज्ञानामुळे तो खूप प्रभावित झाला होता. दिवसभर फोनशी खेळायचा. शाळेच्या दिवसातच त्याने फोनची सर्व माहिती मिळवली होती.’
सुंदर हे पूर्वीपासूनच अभ्यासात हुशार होते. इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही पुढे असायचे. याच कॉलेजमध्ये त्यांची आणि अंजलीची भेट झाली.