आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunita Tomar Poster Girl Of Indias Tobacco War Dies At 28

आता दिसणार नाही तंबाखू विरोधी अभियानाची पोस्टरगर्ल, मोदींना पत्र लिहून नोंदवला विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतात तंबखू विरोधी अभियानातील पोस्टरगर्ल राहिलेली सुनीता तोमरचे बुधवारी पहाटे मध्यप्रदेशातील तिच्या गावी निधन झाले आहे. सुनीता बरेच दिवस मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. तिची इच्छा होती, की तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये तिला तिच्या गावी, मुले आणि कुटुंबांसोबत राहायचे आहे. त्यामुळे तिला सुटी देण्यात आली होती. निधनाच्या दोन दिवस आधी सुनीताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. त्यात सुनीताने भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे प्रमुख दिलीप गांधी यांनी तंबाखूमुळे कर्करोग होतो याला पुष्टी देणारा कोणताही अभ्यास भारतात झालेला नाही असे म्हटले होते, त्याबदद्ल नाराजी व्यक्त केली.
दिलीप गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते, की भारतात असा कोणताही अभ्यास झालेला नाही ज्यातून स्पष्ट होईल की कँसर फक्त तंबाखूमुळे होतो. सुनीताने म्हटले होते, की गांधींनी आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून कळवले होते की तंबाखूजन्य पदार्थांच्या पाकिटावर तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची मोठ्या आकारात चित्रमय माहिती देण्यात येऊ नये. सनीताना मोदींना पत्र लिहून कळवले आहे, 'हे वाचून मला आश्चर्य वाटले एवढे उच्चपदस्थ लोक असे बेजबाबदार कसे असू शकतात.' सुनीता पत्रात पंतप्रधानांना पुढे म्हणते, 'काही दिवसांपूर्वी तुम्ही मन की बात कार्यकर्मात व्यसनमुक्तीवर बोलले होते, मला आशा आहे तुम्ही तंबाखूबद्दल नक्कीच काही कराल.'
काय म्हणाले डॉक्टर
सुनीतावर उपचार करणारे डॉक्टर पंकज चतुर्वेदी म्हणाले, 'सुनीता तीन दिवसांपूर्वी आमच्याकडे आली होती. तिला श्वास घेण्यात अडचण येत होती.' सुनीता फक्त 28 वर्षांची होती. तिला दोन मुले आहेत. भारतात दरवर्षी दहा लाख लोकांचा तंबाखू सेवनामुळे मृत्यू होतो. त्यात सुनीताही एक होती. डॉ. पंकज म्हणाले, 'आम्हाला विश्वास आहे सुनीताच्या माध्यमातून केल्या केलेल्या जनजागृतीमुळे लोक तंबाखूचा त्याग करण्यास मदत होईल.' डॉक्टर म्हणाले, सुनीताचे कुटुंबीय तिच्यावर होणारा खर्चाचा भार उचलण्यास सक्षम नव्हते त्यामुळे हॉस्पिटलच्या सामाजिक कल्याण विभागाने तिच्या उपचारांचा खर्च उचलला होता.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय होती दिलीप गांधी समितीची शिफारस