आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Superstar Rajanikant, Anupam Khair Win Padma Award

रजनीकांत, अॅड. उज्ज्वल निकम \'पद्म\'चे मानकरी; धीरुभाईंना मरणोत्तर पद्मविभूषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत सर्वोच्च नागरी मानला जाणारा पद्म पुरस्काराची घोषणा करण्‍यात आली आहे. सुपरस्टार रजनीकांत, अनुपम खेर यांच्यासह प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह एकूण 118 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्‍यात आले आहे.
रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर तर सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह 8 बड्या हस्तींना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी :
सुपरस्टार रजनीकांत, रामोजी राव, जगमोहन, श्री श्री रवीशंकर, यामिनी कृष्णमूर्ती, गिरीजादेवी, डॉ.विश्वनाथन शांता, धीरूभाई अंबानी (मरणोत्तर पुरस्कार)

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी :
अॅड. उज्वल निकम, अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दिग्दर्शक मधुर भांडारकर

पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी :
अनुपम खेर, उदित नारायण, राम सुतार, विनोद राय, हसनम कन्हैयालाल, सायना नेहवाल, सानिया मिर्झा

पुढील स्लाइडवर वाचा, उज्ज्वल निकम म्हणाले, 'पद्मश्री' आई-वडिलांना समर्पित