आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात पाच वर्षांत जादूटोण्याचे 887 बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तंत्रमंत्र, गंडेदोरे, जादूटोण्याच्या नादात गेल्या पाच वर्षांत देशात 887 लोकांचे बळी गेले आहेत. सखेद आश्चर्याची बाब म्हणजे जादूटोण्याच्या बाबतीत राजधानी दिल्लीला लागून असलेले संपन्न राज्य हरियाणा, आयटी क्षेत्रात विशेष गवगवा झालेल्या कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2012 मध्ये 119 जणांची अंधश्रद्धेतून हत्या करण्यात आली आहे.


महाराष्‍ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलनाचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. देशात प्रगत समजली जाणा-या राज्यांमध्येही अंधश्रद्धा मूळ धरून आहे. अंधश्रद्धेचे सर्वाधिक बळी (32) ओडिशामध्ये गेले आहेत. त्यानंतर झारखंड 26, आंध्र प्रदेश 24, बिहार 13, मध्य प्रदेश 10, छत्तीसगड 8, गुजरात 2, महाराष्‍ट्र, त्रिपुरामध्ये प्रत्येकी एकजणांचा यात बळी गेला आहे. मात्र, 2011 मध्ये देशभरात अंधश्रद्धेने 240 जणांचा बळी गेला आहे. त्यात सर्वाधिक 77 बळी हे कर्नाटकात गेले आहेत. त्याखालोखाल ओडिशा 39, झारखंड 36, आंध्र प्रदेश 28, छत्तीसगड 17, मध्य प्रदेश 15, महाराष्‍ट्र 13, हरियाणा 5, राजस्थान 1 असे बळी गेले आहेत.


अंधश्रद्धेचे अजब किस्से
दूरध्वनी क्रमांक तोच ठेवला : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त यांनी त्यांचा सरकारी मोबाइल नंबर जुनाच ठेवला आहे. विशेष पोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) कार्यालयात लावण्यात आलेला एमटीएनएलचा जुनाच फोन क्रमांक या ठिकाणी शिफ्ट करवून घेतला आणि येथील फोन तेथे शिफ्ट केला. हा सगळा प्रकार लकी नंबरच्या ‘श्रद्धे’तून घडला आहे. अधिका-यांनी त्यांचे फोन क्रमांक बदली केल्याने सर्वसामान्य नागरिक आणि पोलिसांना मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.


ठाण्याचे मुख्य द्वार बदलले
अंधश्रद्धेचे आणखी एक उदाहरण म्हणजे दिल्लीत गुन्हे व गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा ठाण्यात होमहवन केले जाते. पटेलनगर ठाण्यात आरोपींचा ठाण्यातच मृत्यू होण्याच्या घटना वाढल्याने ठाण्याच्या मुख्य द्वाराची दिशा अशुभ असल्याचे कुणी तरी सांगितले. त्यानंतर ते गेट बंद करून त्याची दिशा बदलण्यात आली.