आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Support Of Hurriyat Conference To India, Pakistan Relation

भारत-पाकिस्तानच्या संबंधास हुर्रियत कॉन्फरन्सचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान उभयतांमधील संबंध बळकट करण्यासाठी घेत असलेल्या पुढाकारास हुर्रियत कॉन्फरन्सने बुधवारी पाठिंबा दर्शवला. मात्र, त्याचबरोबर या संबंधात काश्मीर मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्यास वाटाघाटी पुढे सरकणार नाहीत. काश्मीरचा मुद्दा ठरावीक वेळेत सोडवला जावा, अशी मागणीही हुर्रियतने केली आहे.

हुर्रियतच्या संयुक्त गटाचे अध्यक्ष मिरवाईज उमर फारुक म्हणाले, काश्मीर मुद्दा सोडवण्यासाठी दोन्ही देशांनी राजकीय समजूतदारपणा दाखवावा. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात नव्या पिढीच्या हितासाठी काम करण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर संयम दाखवावा. सततच्या गोळीबाराला सामान्य लोक बळी पडतात. दोन्ही देशांच्या सकारात्मक कृतीस पाठिंबा देणे आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही भारत-पाक चर्चेस पाठिंबा देत असल्याचे मिरवाईज यांनी सांगितले. पाकिस्तानी उच्चायुक्ताने आयोजित केलेल्या ईद मिलनसाठी मिरवाईज दिल्लीत उपस्थित होते. या वेळी त्यांना रशियात झालेल्या चर्चेवर प्रतिक्रिया विचारली होती.

निवडणुकीपुरता विचार करू नका
दोन्ही देशंानी विशेषत: भारताला विकासाच्या पुढील टप्प्यात नेऊ पाहणारे पंतप्रधान मोदी यांनी आगामी निवडणूक समोर न ठेवता नव्या पिढीच्या हितासाठी काम करावे, अशी अपेक्षा मिरवाईज यांनी केली. नवी दिल्ली, इस्लामाबाद आणि श्रीनगर निष्कर्षाप्रत पोहोचण्याची ही योग्य वेळ आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर होत असलेल्या गोळीबारात सामान्य माणूस बळी पडत असल्याने दोन्ही बाजूंनी संयम राखला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी केली.

सीमेवर शांततेसाठी उपाय हवा
सीमेवर शांतता ठेवण्यासाठी भारत-पाकिस्तानने एखादे तंत्र विकसित करावे. मोदी-शरीफ यांच्या चर्चेत "एलओसी'वरील शांततेसाठी सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख आणि पाकिस्तानी रेंजर्सच्या प्रमुखांमध्ये नियमित बैठक करण्याचे ठरले होते. असे असताना जुलै महिन्यात शस्त्रसंधीचे नऊ वेळा उल्लंघन झाले. पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात १५ जुलै रोजी पोली देवी ही महिला व बीएसएफच्या २ जवानांसह ६ जणांचा मृत्यू झाला.

२६ /११, समझौता एक्स्प्रेस दुय्यम मुद्दे
मोदी-शरीफ चर्चेत काश्मीरचा समावेश न झाल्याबद्दल मिरवाईज यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासीत यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. काश्मीर हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने चर्चेत त्याचा समावेश झाला पाहिजे. २६ /११ चा हल्ला, समझौता एक्स्प्रेस स्फोट हे दुय्यम मुद्दे आहेत. त्यामुळे काश्मीरचा मुद्दा विशिष्ट कालमर्यादेत सोडवला जावा, यावर मिरवाईज यांनी भर दिला.