आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम यांना सुप्रीम कोर्टाचा तुर्तास दिलासा नाही, जामीन अर्ज फेटळाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वंयघोषीत संत आसाराम यांचा जामीन अर्ज मंगळवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. आसाराम यांच्यावर त्यांच्याच आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या आरोपात ते तुरुंगात आहेत.
सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने आसाराम यांच्या वतीने दाखल जामीन अर्जावर सुनावणी करताना, ज्या आधारावर जामीन मागण्यात आला आहे, त्या आधारावर जामीन देणे शक्य नसल्याचे म्हटले आहे. 16 वर्षीय युवतीने 72 वर्षीय आसाराम यांच्यावर आरोप केला आहे, की त्यांनी त्यांच्या जोधपूर येथील आश्रमात 20 ऑगस्ट 2013 रोजी तिच्यासोबत दुष्कर्म केले.
आसाराम मागील वर्षापासून जोधपूर तुरुंगात कैद आहेत. आज सुप्रीम कोर्टाने राजस्थान सरकारला महत्त्वाच्या सहा साक्षीदारांची नावे मागितली आहेत.