आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Agree Petitions About CBI Probe In Vyapam Scam

व्यापमं: रात्रीतून बदलले चौहानांचे मन, सीबीआय तपासाला होकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - व्यापमं (व्यावसायिक परीक्षा मंडळ) घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अखेर सीबीआय तपासाच्या मागणीला होकार दर्शवला. ते म्हणाले, 'हायकोर्टाला पत्र लिहून तपास सीबीआयकडे व आहे. चौहान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिलीर्ग करण्याचे आदेश देण्याची विनंती करण्यात येणार आहे.'
चौहान म्हणाले, 'गेल्या काही वर्षांपासून जे काही सुरू आहे, त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.' मुख्यमंत्री म्हणाले, की सोमवारच्या रात्री मला झोप लागली नाही. सर्व शंका दूर केल्या पाहिजे असा विचार मी केला.
राज्यपालांविरुद्धची याचिका स्वीकारली
व्यापमं घोटाळ्यावरून राज्यपाल रामनरेश यादव यांच्या बडतर्फीची मागणी याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली. व्यापमं घोटाळ्याच्या सर्व याचिकांवर 9 जुलैला सुनावणी होईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. मध्यप्रदेश हायकोर्टाच्या आदेशानुसार स्थापलेल्या एसआयटीने यादव व त्यांचा मुलगा शैलेशविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.
घोटाळ्याशी संबंधीत 48 जणांचा मृत्यू
घोटाळ्यात आरोपी आणि साक्षीदार मिळून आतापर्यंत तब्बल 48 जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, एसटीएफ आणि राज्य सरकारचा आकडा मात्र खूपच कमी आहे. काँग्रेसने भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारांवर सीबीआय तपासाच्या मागणीचा दबाव वाढवला आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ही मागणी सोमवारी फेटाळली आहे. ते म्हणाले, ‘व्यापमं घोटाळ्यात सीबीआय तपासाची गरज नाही. हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी तपास करत आहे. हायकोर्ट वा सुप्रीम कोर्टाने आदेश दिले तर सरकार सीबीआय तपासासाठी तयार आहे.