आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या 13 वर्षीय बलात्कार पीडितेला SCकडून गर्भपाताची परवानगी, पित्याच्या मित्राचे कृत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलीत वेगाने होणारे शारीरिक बदल लक्षात आल्यानंतर आई-वडिलांनी तिची वैद्यकी तपासणी केली. - Divya Marathi
मुलीत वेगाने होणारे शारीरिक बदल लक्षात आल्यानंतर आई-वडिलांनी तिची वैद्यकी तपासणी केली.
नवी दिल्ली- सर्वोच्चन्यायालयाने मुंबईच्या १३ वर्षीय अत्याचार पीडित मुलीला ३२ आठवड्यांच्या भ्रुणाचा गर्भपात करण्यासाठी बुधवारी परवानगी दिली. या मुलीला गुरुवारी जेजे रुग्णालयात दाखल केले जाईल आणि शुक्रवारी तिचा गर्भपात केला जाईल. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने वैद्यकीय मंडळाच्या तपासणी अहवालाच्या आधारे हा निकाल दिला.सरन्यायाधीश मिश्रा म्हणाले की, पीडितेचे वय आणि तिला होणारा आघात लक्षात घेऊन गर्भपाताची परवानगी देण्यात येत आहे. इयत्ता सातवीतील या मुलीवर तिच्या वडिलांच्या सहकाऱ्यानेच अत्याचार केला होता. देशात कायदेशीररीत्या विशेष परिस्थिती वगळता २० आठवड्यांपेक्षा जास्तीच्या भ्रुणाच्या गर्भपाताची परवानगी नाही. 
 
डॉक्टरांच्या पथकाने दिला होता अहवाल 
- सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील पीठाने डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या अहवालावर हा निर्णय दिला आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या पथकाने पीडितेच्या गर्भावस्थेचा वैद्यकीय अहवाल कोर्टासमोर सादर केला होता. 
- केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल रंजीत कुमार यांनी वैद्यकीय अहवाल आणि अशा प्रकरणांमध्ये आधी दिलेल्या निर्णयांचा हवाला दिला होता. 
- सुप्रीम कोर्टाने हॉस्पिटल प्रशासनाच्या देखरेखीत 8 सप्टेंबरपूर्वी गर्भपात करण्याचे आदेश दिले आहे. त्याआधी एक दिवस मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यास सांगितले आहे. 
- मुंबईत 7वीत शिकणाऱ्या मुलीने गर्भपाताची परवानगी मागितली होती. 
- मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेन्सी (MTP) च्या कलम (3) (2) नुसार 20 आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गर्भपातास परवानगी दिली जात नाही. 
 
असे कळाले आई-वडिलांना 
- मुलगी अचानक जाड दिसायला लागल्याने आणि तिच्यात होणाऱ्या शारीरिक बदलामुळे आई-वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले. 
- वैद्यकीय तपासणीत मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचे कळाले. त्यानंतर मुलीवर बलात्कार झाल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. 
- वडिलांचाच मित्र आणि त्यांच्यासोबत कामाला असलेल्या व्यक्तीने कोवळ्या मुलीवर अमानुष अत्याचार करुन तिला गर्भवती केले होते. 
- पीडितेच्या आई-वडिलांनी गर्भपाताची परवानगी मागितली, मात्र तोपर्यंत फार उशिर झालेला होता. त्यामुळे त्यांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले. अखेर सुप्रीम कोर्टाने पीडितेला मुलीचे वय आणि तिला होणाऱ्या वेदना लक्षात घेऊन गर्भपाताची परवानगी दिली आहे. 
बातम्या आणखी आहेत...