आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजमहाल नष्ट व्हावा, असे तुम्हाला वाटते का? सर्वाेच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जगप्रसिद्ध ताजमहाल नष्ट व्हावा, अशी तुमची इच्छा अाहे काय? अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली अाहे. दिल्ली-मथुरा या दाेन शहरांदरम्यान अतिरिक्त रेल्वे रूळ टाकण्यासाठी ४०० झाडांची कत्तल करण्याप्रकरणी दाखल तक्रारीवर सुनावणी करताना काेर्टाने सरकारवर वरीलप्रमाणे ताशेरे अाेढले.

ताजमहाल हे जगप्रसिद्ध स्मारक अाहे तुम्ही (सरकार) ते नष्ट करू इच्छिता काय? तुम्ही ताजमहालची सद्य:स्थिती पाहिली अाहे काय? इंटरनेटवर जाऊन ती बघा, अशी संतप्त विचारणा न्यायमूर्ती मदन बी.लाेकूर दीपक गुप्ता यांनी सरकारला केली. तसेच जर तुम्हाला ताजमहाल नष्ट व्हावा, असे वाटत असेल, तर तसे स्पष्ट रूपात म्हणणे सादर करा, असे अादेशदेखील न्यायालयाने दिले.
 
ताजमहालचा युनेस्काेच्या जागतिक वारसास्थळांत समावेश असून, हे जगप्रसिद्ध स्मारक माेगल शासक शहाजहानने अापल्या पत्नीच्या स्मृतीप्रीत्यर्थ १६३१ मध्ये बांधले अाहे. एेतिहासिक ताजमहालसह त्याच्या परिसराचा विकास संरक्षणाच्या देखभालीबाबत पर्यावरणप्रेमी एम.सी.मेहता यांनी सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, याप्रकरणी सुनावणी सुरू अाहे. रेल्वे रूळ टाकण्यासाठी झाडे ताेडणे ताजमहालचे साैंदर्य नष्ट करणे अावश्यक अाहे काय? याबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश देऊन न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी पुढील महिन्यात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, मेहता यांनी अापल्या याचिकेत ताजमहाल त्याच्या परिसराचे वायुप्रदूषण वृक्षताेडीपासून संरक्षण करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला अाहे.
बातम्या आणखी आहेत...