आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल खरेच आजारी होते का? बैठकीला अनुपस्थित राहिल्याने सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - डेंग्यू व चिकुनगुन्याचा निपटारा करण्यासाठी रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांच्या अनुपस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तथापि, उपराज्यपाल नजीब जंग यांच्यासह दिल्ली सरकारच्या या बैठकीबाबत न्यायालयाला सांगितले की, ते आजारी असल्याने ते या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत. यावर न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांनी दिल्ली सरकारच्या वकिलांना विचारले की, मुख्यमंत्री खरोखरच आजारी होते का? मला तर टीव्ही वा इतर माध्यमांतून मिळालेल्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री केजरीवाल तर रविवारी गुजरातेत होते.
खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, आम्ही टीव्ही वाहिन्यांचे रिपोर्ट पाहिले आहेत. कचऱ्याचा योग्य प्रकारे निपटारा न झाल्याने लोक मरत आहेत. शहरातील त्या क्षेत्रावर कचरा टाकला जात आहे. जिथे लोक राहताहेत आणि अशावेळी आपण काय करत आहात? याच्या उत्तरादाखल दिल्ली सरकारच्या वतीने सॉलिसीटर जनरल रंजित कुमारने सांगितले की, पुढल्या सुनावणीच्या वेळी आम्ही हा खुलासा करू की, कचरा टाकण्यासाठीची जागा बदलता येईल की नाही आणि याप्रकरणी काय केले जात आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार दिल्लीत यावर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत चिकुनगुन्याचे ७,४२५ आणि डेंग्यूचे ३ हजारांहून अधिक प्रकरणे आली आहेत.

लोक अडचणीत आहेत कमीत कमी याचा तरी विचार करा
डेंग्यू-चिकुनगुन्याप्रकरणी हरित लवादानेही दिल्ली सरकारला फटकारले. याप्रकरणी विलंब झाल्याने सोमवारी न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या बेंचने सरकारला म्हटले की, आमच्या निर्देशाशिवाय गंभीर विषयावर आपण अातापर्यंत स्टेटस रिपोर्ट देखील देऊ शकले नाहीत. इथे लोकांना त्रास सहन करावा लागतोय. आपण कमीत कमी या सत्याचा तरी विचार ठेवावा यावर दिल्ली सरकारने बेंचला सांगितले की, त्यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापली आहे. ते स्टेटस रिपोर्ट जमा करू शकतात.
बातम्या आणखी आहेत...