आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Supreme Court Ban On National Highways Liquor Vends Does Not Apply To Bars. Read More News At Divyamarathi.com

राष्ट्रीय महामार्गावरील दारु बंदीचा निर्णय बार अॅण्ड रेस्तरॉला लागू होत नाही- सुप्रीम कोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावरील दारु बंदीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बार अॅण्ड रेस्तरॉला लागू होत नसल्याचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी केरळ सरकारला दिले आहेत. रोहतगी यांनी सांगितले की, राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर 500 मीटर अंतरावर दारुविक्रीवरील प्रतिबंध बार आणि रेस्तराँला लागू होत नाही.
 
दरम्यान, महार्गावरील वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह राज्य महामार्गांवरील दारुविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे यापुढे महामार्गांच्या दोन्ही बाजूला 500 मीटर अंतरावर दारू विक्री होणार नाही.

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण आणि कारणमीमांसा ऐकल्यानंतर सुप्रिम कोर्टाने महामार्गांवरील दारू विक्रीची दुकाने 500 मीटरच्या बाहेर हटवण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे देशभरातील महामार्गांवरील दुकाने 500 मीटर अंतराबाहेर जाणार आहेत, अन्यथा 1 एप्रिल 2017 पासून या दुकानांना परवाने दिले जाणार नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

बहुतांश अपघातांमध्ये वाहनचालकाने मद्यप्राशान केल्याचे स्पष्ट होत आहे. महामार्गांवर दारू सहज उपलब्ध होत असल्याने वाहनधारक प्रवासादरम्यानच दारूची खरेदी करतात आणि मद्यप्राशनही करतात. नशेत वाहन चालवताना अपघात होऊन मोठी हानी होते.
बातम्या आणखी आहेत...