आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Campared Modi Government Inactive Character

केंद्र सरकार कुंभकर्ण, सर्वोच्च न्यायालयाकडून मोदी सरकारची तुलना कामचुकार पात्राशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर कडक ताशेरे ओढताना सरकारची तुलना कुंभकर्ण आणि ‘रिप वान विंकल’ या कामचुकार पात्रांशी केली. अलकनंदा आणि भागीरथी नदीवरील जलविद्युत प्रकल्पांबाबतचा अहवाल सादर केल्याने केंद्रावर हे ताशेरे ओढले.
न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. अहवाल मिळाल्याने खंडपीठ चांगलेच संतापले. ‘अहवाल आमच्यासमोर यायला हवा होता. तुम्ही (केंद्र) कुंभकर्णाप्रमाणे वागत आहात. अहवाल सादर का झाला नाही, हे आम्हाला कळू शकले नाही. तुमचा उद्देश काय आहे? तुम्ही रिप वान रिंकलसारखे आहात,’ अशा शब्दांत न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांत अहवाल द्यावा, असे आदेश न्यायालयाने १२ ऑगस्ट २०१४ रोजी दिले होते.

अलकनंदा आणि भागीरथीवर २४ जलविद्युत प्रकल्पांचा जैवविविधतेवर काय परिणाम होईल याबाबतचा अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले होते. ‘जोपर्यंत तुम्ही अहवाल सादर करत नाही तोपर्यंत नवीन प्रकल्पांवरील स्थगिती मागे घेतली जाणार नाही,’ असे न्यायालयाने बजावले. उत्तराखंडमध्ये गेल्या वर्षी आलेल्या आपत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट २०१३ ला नव्या योजनांवर बंदी घातली होती.

२० वर्षांपर्यंत झोपला होता रिप वान
रिपवान विंकल हे १९ व्या शतकातील प्रसिद्ध पात्र कामचुकारपणाबद्दल प्रसिद्ध होते. तो जवळपास २० वर्षे झोपलेला होता, असे गोष्टीत म्हटले आहे.