आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Change Virppan's Aid Hanging Excuation Turn Into Life Prisonment

वीरप्पनच्या साथीदारांसह 15 दोषींची फाशी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत बदलली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनच्या चार साथीदारांसह 15 दोषींची फाशी सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत बदलली. दया अर्जावरील निर्णयास सरकारकडून झालेल्या विलंबाचा आधार या निकालात देण्यात आला. वीरप्पनचा मोठा भाऊ ज्ञानप्रकाशसह त्याच्या चार सहकार्‍यांचा फाशी रद्द झालेल्यांमध्ये समावेश आहे. सर्वाधिक 7 कैदी कर्नाटकातील असून उत्तर प्रदेशच्या 4, हरियाणातील दोन आणि मध्य प्रदेश व उत्तराखंडातील प्रत्येकी एका कैद्याला आता फाशीऐवजी जन्मठेप भोगावी लागेल.
राजीव गांधींच्या मारेकर्‍यांनाही दिलासा? : राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी मुरुगन, संथानम आणि पेरारिवलन यांच्या फाशीलाही सध्या स्थगिती दिलेली आहे. 29 जानेवारीला यावर सुनावणी होत आहे. अकरा वर्षांपासून फाशीची वाट पाहणार्‍या या दोषींनाही दिलासा मिळू शकतो.
खलिस्तानी अतिरेक्यालाही लाभ
खलिस्तानी अतिरेकी देविंदरपालसिंग भुल्लर याचा दयेचा अर्ज मे 2011 मध्ये फेटाळण्यात आला होता. अद्याप त्याला फाशी दिलेली नाही.