आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Commented On Cosmetic Surgery Clinic

क्रीमनेही गोरे झाले नाही तर आम्ही काय करणार ? सर्वाच्च न्यायालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्राला कॉस्मेटिक सर्जरी क्लीनिक्स, त्यांच्या जाहिरातींवर मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. कोर्ट म्हणाले, आम्ही अशी तत्त्वे जारी करण्यास बसलेलो नाही, आमच्याकडे यापेक्षाही चांगली कामे आहेत. अनेक वर्षांपासून एक ब्यूटी क्रीम बाजारात येते. ती लावल्यास गोरे व्हाल, असा दावा त्यात असतो.
तुम्ही गोरे झाले नसाल तर आम्ही काय करावे
चंद्रलेखा शर्मांनी याचिकेत म्हटले होते की, एका कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक समस्या भेडसावल्या. क्लिनिक्स लोकांना सुंदर बनवण्याच्या जाहिराती करतात. लोक शस्त्रक्रियाही करवून घेतात. मात्र, तेथे चांगले डॉक्टर, उपकरणे नसतात. त्यांच्यावर नियंत्रणासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखावी. मात्र कोर्ट म्हणाले, खटला ग्राहक न्यायालयातच चालू द्यावा.अशा याचिकांवर सुनावणी करत बसलो तर उद्या लोक ‘केस उगवणारे तेल लावूनही केस आले नाही,’ असे म्हणत कोर्टात येत बसतील.