आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Decision On Aadhar Card News In Marathi

‘आधार’ची सक्ती तत्काळ मागे घ्या; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्याविषयी केंद्राने आदेश दिले असतील तर ते तत्काळ मागे घ्यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. आधारची माहिती संबंधित व्यक्तीच्या मंजुरीशिवाय सरकारी यंत्रणेकडे दिली जाऊ नये, असे निर्देशही न्यायालयाने दिले. एका बलात्कार प्रकरणात आरोपींची ही माहिती सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश गोवा खंडपीठाने दिला होता.