आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न दिलेल्या फ्लॅटचे पैसे परतीचे आदेश, युनिटेक बिल्डरला झटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ग्राहकांकडून फ्लॅटची रक्कम घेऊनही वेळेत फ्लॅटचा ताबा न दिल्याने युनिटेक बिल्डरला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत १५ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

युनिटेक बिल्डरच्या नोएडा व गुरगावमधील गृहप्रकल्पात ३८ ग्राहकांनी पूर्ण रक्कम भरून फ्लॅट घेतले. मात्र युनिटेक बिल्डरने ग्राहकांना वेळेत फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे ग्राहकांनी ग्राहक मंचात धाव घेतली होती. ग्राहक मंचाने बिल्डरला ५ कोटींचा दंड ठोठावत ग्राहकांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश दिले होते.
बातम्या आणखी आहेत...