आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल २३ सप्टेंबरपर्यंत वाढवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचा पॅरोल आणखी एका आठवड्यासाठी म्हणजेच २३ सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे. रॉय यांचा पॅरोल शुक्रवारी संपणार होता. सुनावणीदरम्यान सहारा समूहाने ३५३ कोटी रुपयांचा ड्राफ्ट सेबी-सहारा खात्यात जमा करण्यात आल्याचे वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने राॅय यांना एक आठवड्याचा पॅरोल वाढवण्यास मंजुरी दिली.
बातम्या आणखी आहेत...