आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Extends Time Limit For Sanjay Dutt To Surrender

संजय दत्तला शरणागतीसाठी चार आठवड्यांची मुदतवाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी सुनावण्‍यात आलेली शिक्षा भोगण्‍यासाठी संजय दत्तला शरण येण्‍याकरीता सर्वोच्‍च न्‍यायालयाने 4 आठवड यांची मुदतवाढ दिली आहे. संजय दत्तला 18 एप्रिलपर्यंत मुदत देण्‍यात आली होती. परंतु, त्‍याने 6 महिन्‍यांच्‍या मुदतवाढीसाठी न्‍यायालयात अर्ज दाखल केला होता. त्‍यावर आज सुनावणी झाली.

सर्वोच्‍च न्‍यायालयाने संजय दत्तला केवळ मानवतेच्‍या दृष्‍टीकोनातून मुदतवाढ देत असल्‍याचे सांगितले. हा कालावधी संपल्‍यानंतर पुन्‍हा मुदतवाढ देण्‍यात येणार नाही, असेही न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले. मुदतवाढीचा कालावधी उद्या 18 एप्रिलपासून सुरु होणार आहे. त्‍यामुळे त्‍याला 17 मे रोजी उर्वरित शिक्षा भोगण्‍यासाठी न्‍यायालयात शरण यावेच लागेल. सर्वोच्‍च न्‍यायालयाने याप्रकरणी सीबीआयचा दावा फेटाळला.