आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Filed Petation In West Bengal Rape Case

प. बंगाल अत्याचार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली /कोलकाता - पश्चिम बंगालमधील बीरभूम सामूहिक अत्याचाराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सरन्यायाधीश पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्वत: याचिका दाखल करून सुनावणी घेतली. घटना धक्कादायक असून जिल्हा न्यायाधीशांनी घटनास्थळी जाऊन तपास करावा, असे निर्देश शुक्रवारी न्यायालयाने दिले. त्याचा अहवाल सात दिवसांत मागवण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारलादेखील नोटीस पाठवली. 31 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे बजावले. अत्याचाराची संतापजनक घटना सोमवारची आहे. बीरभूममधील लाभपूरच्या गावप्रमुखाने मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याचा निर्णय दिला होता. इतर समाजातील मुलावर प्रेम करणे एवढाच मुलीचा गुन्हा होता. गावप्रमुखाने पहिल्यांदा मुलीला आणि नंतर मुलाला प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, पीडित मुलीच्या प्रकृतीत शुक्रवारी काही प्रमाणात सुधारणा दिसून आली. नागरिकांमध्ये घटनेबद्दल अजूनही संताप असल्याने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत आहेत.
स्टेजवर नेऊन अत्याचार : गावप्रमुखाने दिलेल्या आदेशानंतर पीडित मुलीवर गावात असलेल्या स्टेजवर नेऊन अत्याचार करण्यात आला. हे कृत्य सर्व गावाने पाहावे यासाठी तसे करण्यात आल्याचे पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.
आरोपींमध्ये मुलीच्या वडिलांच्या वयाचेदेखील लोक होते. बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार करण्यात आल्याचे पीडित मुलीने आपल्या जबाबात म्हटले होते.