आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Gives 4 Weeks Time To Yousuf Nalwala

संजय दत्तच्या मित्रासह झैबुन्निसाला कोर्टाचा दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने 1993 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील दोषी युसूफ नळवाला, इस्सा मेमन आणि आफताब अली यांच्यासोबत झैबुन्निसा काझी या चौघांना शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. (संजय दत्तला दिलासा) युसूफ नळवाला हा संजय दत्तचा मित्र असल्याचे बोलले जाते. या चौघांआधी बुधवारी न्यायालयाने संजय दत्तला शरण येण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

मार्च मध्ये सर्वोच्च न्यायालयाने झैबुन्निसा हिला पाच वर्षांची शिक्षा सुनावत एका महिन्यात शरण येण्याचे आदेश दिले होते. ही मर्यादा आज (18 एप्रिल) संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष काटजू यांनी संजय दत्त आणि झैबुन्निसासह या आरोपातील अनेक दोषींना माफ करण्याची मागणी करणारा अर्ज राष्ट्रपतींना पाठवला आहे. यात त्यांनी विनंती केली आहे की, दोषींच्या दया याचिकेवर जोपर्यंत निर्णय होत नाही तो पर्यंत त्यांना कारागृहात पाठवू नये.