आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्याप्रश्नी सरकार चुकीच्या दिशेने, सुप्रीम कोर्टाने व्‍य‍क्‍त केली चिंता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली. या वास्तविक समस्येचा सामना करताना सरकार चुकीच्या दिशेने जात असल्याची भावनाही न्यायालयाने व्यक्त केली आहे. या ज्वलंत प्रश्नाबाबत केंद्र सरकारने कोणती धोरणे आखली याची माहिती देण्याचे निर्देशही सरन्यायाधीश जे. एस. खेहर  यांनी दिले आहेत. 

हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे हा काही या समस्येवरील तोडगा होऊ शकत नाही, असेही न्या. खेहर यांनी म्हटले आहे. शेतकरी बँकांकडून कर्जे घेतात आणि परतफेड करू शकत नाही, तेव्हा आत्महत्या करतात. आत्महत्येनंतर शेतकऱ्यांना पैसे देणे हा काही तोडगा नाही. तर आत्महत्या रोखण्यासाठी तुमच्याकडे प्रभावी योजना हव्यात, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.
 
बातम्या आणखी आहेत...