आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या सहाराश्रींना दिलासा नाहीच, जामिनावर अनिश्चितता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या 14 महिन्यांपासून जेलमध्ये असलेले सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने आजही (गुरुवार) दिलासा दिलेला नाही. गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत करण्याप्रकरणी रॉय यांनी दाखल केलेल्या जामिनावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. चार आठवड्यात सुब्रत रॉय गुंतवणुकदारांचे पैसे कसे परत करतील याची योजना सांगा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या वेळी झालेल्या सुनावणीच्या वेळी सहारा समुहाने न्यायालयाला आश्वासन दिले होते, की कालपर्यंत (बुधवार) बॅंक गॅरंटी भरली जाईल. समुहाने आता पैसे जमा केले आहेत. यावर सेबीने बॅंक गॅरंटी जमा झाली असून सुब्रत रॉय यांच्या जामिनावर आक्षेप नसल्याचे सांगितल्यास रॉय यांना दिलासा मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे. 67 वर्षीय रॉय यांच्या सुटकेसाठी 10 हजार कोटी रुपये बॅंक गॅरंटीच्या रुपाने सेबीत जमा करण्यास न्यायालयाने सांगितले होते. यातील निम्मी रक्कम रोख भरावी लागणार होती.
गुंतवणुकदारांचे 24 हजार कोटी रुपये परत न केल्याने 4 मार्च 2014 पासून सुब्रत रॉय दिल्लीच्या तिहार कारागृहात आहेत. त्यांच्या कंपनीचे दोन संचालक रविशंकर दुबे आणि अशोक रॉय हेही याच प्रकरणी तिहार तुरुंगात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, सुब्रत रॉय बॅटमिंटन खेळून ठेवत आहेत स्वतःला फिट....