आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षकांना इशारा: गुंडगिरीला थारा देऊ नका; सुप्रीम कोर्टाने कडक शब्दात सरकारला सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सर्वाेच्च न्यायालयाने गोरक्षकांच्या मुद्द्यावर शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारांना कडक शब्दात सुनावत कुठल्याही प्रकारच्या गुंडगिरीला चिथावणी देऊ नये, असे सांगितले. तसेच गोरक्षणाच्या नावावर होत असलेल्या हिंसक घटनांवरही चार आठवड्यांत उत्तर मागितले आहे.
 
न्या. दीपक मिश्रा यांच्या पीठासमाेर महाधिवक्ता रंजितकुमार म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचा विषय राज्यांचा आहे. यामध्ये केंद्राची भूमिका नसते. देशातील कोणत्याही प्रकारच्या रक्षक गटांना स्थान नाही,अशी केंद्राची भूमिका आहे. सरकारने हिंसाचाराचे कधी समर्थन केले नाही ना कधी करेल.’ दरम्यान, या विषयावर हिंसाचार  व राजकारण बंद व्हावे, अशी भूमिका संघाने व्यक्त केली अाहे.