आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Supreme Court Hear Entry Ban Of Women In Sabarimala Temple

सबरीमाला मंदिराची आज SC मध्‍ये सुनावणी, 1500 वर्षांपासून महिलांना प्रवेशबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ तिरुवनंतपुरम- केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्‍यावरुन होत असलेल्‍या विरोधावर सोमवारी सर्वोच्‍च न्‍यायालयात महत्‍त्‍वपूर्ण सुनावणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर मंदिरात 400 वर्ष जुनी परंपरा तोडून महिलांनी चौथ-यावर प्रवेश केला. त्‍यामुळे सबरीमाला मंदिरासंदर्भातही सर्वांच्‍या नजरा आता सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे लागल्‍या आहेत.

का आहे महिलांना प्रवेशबंदी..
- सबरीलाल मंदिराच्‍या परंपरेनुसार येथे 10 ते 50 वयोगटातील महिलांना प्रवेशबंदी आहे.
- मंदिर ट्रस्टच्‍या माहितीनुसार येथे 1500 वर्षांपासून महिलांना प्रवेश दिला जात नाही.
- यासंदर्भात काही धार्मिक कारणे सांगितले जातात.
- केरळच्‍या यंग लॉयर्स असोसिएशन नावाच्या संस्थेने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशबंदीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती.
- सुमारे 10 वर्षांपासून हे प्रकरण न्‍यायालयात खोळंबलेले आहे.
सर्वोच्‍च न्‍यायालयाने आधी म्‍हटले होते..
- मागील सुनावणीच्‍या वेळी न्‍यायालयाने ट्रस्‍टला विचारले होते, “ जेव्‍हा वेद, उपनिषदे किंवा कोणतेही शास्‍त्र महिला किंवा पुरूषांमध्‍ये भेदभाव करत नाहीत, तर सबरीमाला मंदिरात का? मंदिरात महिलांना कधी प्रवेश बंद करण्‍यात आला होता आणि याचा इतिहास काय आहे.?''

- न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले होते, महिलांना मंदिरात प्रवेश करण्‍यासाठी कोणीही बंदी घालू शकत नाही.
- कोर्टाने म्‍हटले होते, येथे 1500 वर्षांपासून महिलांना प्रवेशबंदी आहे. यावर विश्‍वास ठेवला जाऊ शकत नाही.
- सबरीमाला मंदिर बोर्डाचे अध्‍यक्ष गोपालकृष्णन यांनी नोव्‍हेंबर 2015 मध्‍ये महिलांच्‍या प्रवेशावरून वादग्रस्‍त विधान केले होते. त्‍यांच्‍या या विधानाविरोधात महिलांनी सोशल मीडियावर कॅम्‍पेन चालवले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, याचिकाकर्त्‍यांना दिली होती जीवे मारण्‍याची धमकी..