आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IIT प्रवेशाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; 50 हजार विद्यार्थ्यांवर होणार परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोर्टाच्या निकालाचा परिणाम या परीक्षेत पात्र ठरलेल्या 50 हजार 455 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. (फाईल) - Divya Marathi
कोर्टाच्या निकालाचा परिणाम या परीक्षेत पात्र ठरलेल्या 50 हजार 455 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. (फाईल)
नवी दिल्ली - आयआयटींमध्ये संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Advance) अंतर्गत केल्या जाणाऱ्या काउंसेलिंग आणि प्रवेश संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी घेतली जाणार आहे. सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारच्या प्रवेश प्रक्रिया पुढील शुक्रवारपर्यंत थांबवल्या होत्या.
 
 
कोर्टाच्या निकालाचा परिणाम या परीक्षेत पात्र ठरलेल्या 50 हजार 455 विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. विशेष म्हणजे, यापैकी 33 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच प्रक्रियेनुसार प्रवेश सुद्धा घेतले आहेत. या परीक्षेत ग्रेस मार्क देण्याच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने याबाबत केंद्र आणि आयआयटी मद्रासला नोटीस बजावून उत्तर मागवले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...