आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित राष्ट्रपती, चहा विकणारा PM, पोस्टर लावणारा उपराष्ट्रपती; हेच स्वातंत्र्य - सरन्यायाधीश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तुम्ही जे काही अाहात त्याचा अभिमान बाळगा. तरच देशाची प्रगती हाेईल. सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान असला पाहिजे. कारण हा देश सर्व धर्मांचा सारखाच सन्मान करताे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश जे.एस.खेहर यांनी केले.
 
 सर्वाेच्च न्यायालयात अायाेजित स्वातंत्र्य दिनाच्या ७१ व्या समारंभात ते बाेलत हाेते. ते म्हणाले, मी केनियात जन्मलो व अाता भारताचा सरन्यायाधीश अाहे. त्या वेळी केनियात ब्रिटिश प्रथम नागरिक हाेते. दुसऱ्या स्थानी अमेरिकेचे, तिसऱ्या स्थानी युराेपियन, चाैथ्यावर अाफ्रिकन व नंतर एशियन. जेव्हा चारही जणांमधून काेणीही नसेल तेव्हा भारतीयाला संधी मिळत असे. भारतात मात्र तुम्ही काेणतेही माेठे पद मिळवू शकता. आपले राष्ट्रपती दलित अाहेत, ते गरिबीत वाढलेत व एका सामान्य कुटुंबातून अाले अाहेत. तसेच उपराष्ट्रपती एका शेतकऱ्याचे पुत्र अाहेत. त्यांनी भिंतींवर पाेस्टर्स लावून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. याशिवाय पंतप्रधान चहा विकत हाेते.
 
पुढील स्‍लाइडवर...पुरात फडकवला तिरंगा
 
बातम्या आणखी आहेत...