आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीही हिंदू आहे, घरी देखील होऊ शकते पूजा; मंदिरावरील टाळेबंदीवर SC जजचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जस्टिस दवे म्हणाले, तुम्ही चिंता करु नका, ते प्रकरण  योग्यवेळी बोर्डावर येईल. - Divya Marathi
जस्टिस दवे म्हणाले, तुम्ही चिंता करु नका, ते प्रकरण योग्यवेळी बोर्डावर येईल.
नवी दिल्ली - 'लोक मंदिरात गेले, नाही गेले तरी देवाची पूजा नक्की करतात !' हे सुप्रीम कोर्टातील एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान, जस्टिस दवे यांच्या वक्तव्य कोर्टरुमचे वातावरण हलके करुन गेले.

झाले असे, की तामिळनाडुतील एका वकिलांनी तेथील 63 मंदिरांना टाळे लागले असल्याचा मुद्द्दा उपस्थित केला होता. वकिलांचे म्हणणे होते, की जजसाहेब या प्रकरणाची सुनावणी लवकर करा, कारण मंदिरे बंद आहेत आणि लोक पुजा-अर्चना करु शकत नाहीत. त्यावर जस्टिस ए.आर.दवे यांनी मिश्किल कॉमेंट केली. ते म्हणाले, 'वकीलसाहेब, मंदिरं बंद आहेत म्हणून पूजा-पाठ होत नाही, असे काही सांगू नका. मी हिंदू आहे, घरात रोज पूजा करतो. मला माहित आहे, लोक मंदिरात गेले, किंवा नाही गेले तरी आपापल्या देवांची पूजा नक्की करतात.'

- गुरुवारी सुप्रीम कोर्टात जस्टिस दवे यांच्या नेतृत्वातील पीठापुढे एक महत्त्वाच्या प्रकरणावर लवकर सुनावणी करावी, अशी विनंती करण्यात येत होती.
- दरम्यान, कोर्टरुममध्ये तामिळनाडुच्या एका वकिला महाशयांनी सांगितले, की तेथील 63 मंदिरांवरील अनेक याचिकांमुळे देव कुलूपबंद आहेत. या प्रकरणी 24 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.
- वकिलांनी यावर लवकरात लवकर सुनावणी घेण्यावर जोर दिला होता. जस्टिस दवे म्हणाले, तुम्ही चिंता करु नका, त्या प्रकरण योग्यवेळी बोर्डावर येईल. 24 ऑक्टोबरला त्यावर सुनावणी केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...